दोनशेचा टोमॅटो आला दोन रुपयांवर; मजुरी सुटणेही झाले अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:48 AM2023-09-09T07:48:40+5:302023-09-09T07:49:00+5:30

जिल्ह्यातून गुजरात, हरयाणा, हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका, आदी भागांत टोमॅटोची निर्यात होते.

Two hundred tomatoes came at two rupees; Salary has also become difficult | दोनशेचा टोमॅटो आला दोन रुपयांवर; मजुरी सुटणेही झाले अवघड

दोनशेचा टोमॅटो आला दोन रुपयांवर; मजुरी सुटणेही झाले अवघड

googlenewsNext

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : महिन्यापूर्वी २०० रुपये किलो असलेल्या टोमॅटोचा ‘तोरा’ उतरला आहे. शुक्रवारी (दि. ८) टोमॅटोला अवघा दोन रुपये किलो असा दर मिळाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. 

जिल्ह्यातून गुजरात, हरयाणा, हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका, आदी भागांत टोमॅटोची निर्यात होते; परंतु भाव नसताना मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेल्या टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्चून टोमॅटोचे पीक घेतले; परंतु मजुरी सुटणेही अवघड झाले आहे. 

Web Title: Two hundred tomatoes came at two rupees; Salary has also become difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.