सांजेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:27 AM2018-12-15T01:27:57+5:302018-12-15T01:28:11+5:30
सांजेगाव (ता. इगतपुरी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाडीवºहे : सांजेगाव (ता. इगतपुरी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सांजेगाव येथे श्ुक्रवारी दुपारी शेतात काम करत असताना झुडपात लपलेल्या बिबट्याने हेमंत निमसे आणि राहुल गोवर्धने या युवकांवर हल्ला केला. आरडाओरडा करत या युवकांनी त्यास पळवून लावले. यात हेमंत याच्या पायाला, तर राहुल याच्या हातावर जखमा झाल्या आहेत. पळून गेलेला बिबट्या तेथेच झाडीत लपून बसलेला असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुकणे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या सांजेगावात सध्या रब्बी हंगामाची कामे सुरू असून, रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जात असतात. बिबट्याच्या वास्तव्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी हजर झाले होते.
यावेळी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.