दोन जॉगर्स महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 06:58 PM2020-09-13T18:58:08+5:302020-09-13T18:59:25+5:30

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांत सोनसाखळी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. भद्रकाली व इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत सकाळी मॉर्निंग वॉक करणार्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.

Two joggers snatched the women's gold chains | दोन जॉगर्स महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

दोन जॉगर्स महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

Next
ठळक मुद्दे३७ ग्रॅम सोने लुटले : घरफोडी, चेनस्नाचिंगच्या घटनांत वाढ

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांत सोनसाखळी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. भद्रकाली व इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत सकाळी मॉर्निंग वॉक करणार्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका मिहलेचे मंगळसूत्र ओरबडल्याची घटना टाकळी रोड परिसरात घडली. याप्रकरणी हेमांगी सुनिल शिरसागर (६०, रा. घोडेस्वारबाबा दर्गासमोर, टाकळीफाटा) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी शीरसागर या वॉकिंग करत असताना त्यांच्या समोरून मोटारसायकलवरून आलेल्या इसमानी त्याच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून पळ काढला. अशाचप्रकारे दुसरी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी रस्त्यावर घडली.
पाथर्डी फाट्याकडून पाथर्डीगावाच्या दिशेने सकाळी ७ वाजेच्या सुमारास फेरफटका मारत असलेल्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे ४२ हजार रु पयांची मनी मंगळसूत्र अज्ञात दोघा दुचाकीस्वारांनी जबरदस्तीने ओरबडून नेल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.१२) अलका भास्कर टिपायले (२१, रा.गुरु दत्त रो-हाऊस अयोध्या कॉलनी) या शनिवारी ( दि.१२) सकाळी पावणे सातच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी पाथर्र्डीफाटापासून ते पाथर्र्डी गावाकडे जात असताना त्यांच्यासमोरून दुचाकीवर आलेल्या दोघां अज्ञात इसमापैकी पाठीमागे बसलेल्या एका इसमाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची मणी-मंगळसूत्राची पोत बळजबरीने हिसकावली यावेळी काही भाग रस्त्यावर तुटुन पडला तर उर्वरित पोत चोरटे घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुमारे ४२ हजार रु पयांचा ऐवज लुटल्याने इंदिरानगर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two joggers snatched the women's gold chains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.