मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:23 AM2018-05-31T01:23:02+5:302018-05-31T01:23:02+5:30
नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवºहे फाट्यावर मारुती ८०० आणि स्विफ्ट डिझायर यांच्यात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले.
घोटी : नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवºहे फाट्यावर मारुती ८०० आणि स्विफ्ट डिझायर यांच्यात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले. इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मुरंबी येथील नागरिक विल्होळी येथे काही कार्यक्रमाला गेले होते. तेथून ते सर्व मारुती ८०० (एम.एच.0१ व्ही. १४१३) या कारने परतत असताना पहाटे साडेतीन वाजता वाडीवºहे फाट्यावर वळण घेत असताना मुंबईकडून भरधाव येत असलेल्या स्विफ्ट डिझायर (एम एच ०४ जी. डी. १७३३) या कारने जोरदार धडक दिली. या धडकेने मारुती कारमध्ये बसलेले सोमनाथ सुकदेव जाधव (३८) रा. सांजेगाव आणि विमल भीमा मते (४०) रा.मुरंबी हे जागीच ठार झाले, तर सागर कचरू गोवर्धने (१९) सीताबाई कचरू गोवर्धने (४०), कचरू खंडू गोवर्धने (४६), अनिता सोमनाथ जाधव (३०), अक्षय भानुदास गोवर्धने सर्व रा.सांजेगाव ता.इगतपुरी तर राजुबाई गंगाराम मते (४८) रा.मुरंबी हे सहा जण जखमी झाले या धडकेत मारुती कारचा चक्काचूर झाला. घटनेचे वृत्त समजताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानचे रुग्णवाहिका चालक निवृत्ती पाटील आणि शासकीय १०८ रुग्णवाहिका यांनी त्वरित धाव घेत जखमींना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, स्विफ्ट डिझायरमधील दोघे अद्याप फरार आहेत.