जुन्या कसारा घाटात अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:51 AM2018-08-21T01:51:55+5:302018-08-21T01:52:15+5:30
जुन्या कसारा घाटातील लतीफवाडी जवळील बाबा का ढाबा येथे रस्त्याच्याकडेला उभी असलेली होंडा सिटी कार व पीकअपला मागून भरधाव येणाऱ्या आॅइल टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले.
इगतपुरी : जुन्या कसारा घाटातील लतीफवाडी जवळील बाबा का ढाबा येथे रस्त्याच्याकडेला उभी असलेली होंडा सिटी कार व पीकअपला मागून भरधाव येणाऱ्या आॅइल टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले. जुन्या कसारा घाटातील लतीफवाडी जवळील बाबा का ढाबा येथे रस्त्याच्या कडेला सकाळी नाष्टा करण्याकरीता पिकअप (एमएछ ४८ पी १७७३) व त्यामागे होंडा सिटी कार (एमएच०२ इपी ९११९) उभी होती. यावेळी मुबंईहुन नाशिककडे भरधाव येणाºया आॅइल टँकर (जीजी १२ एझेड ६०५१) चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने उभ्या असलेल्या होंडा सिटी कारला मागुन जोरदार धडक दिल्याने कार मधील सुशिला सुब्रमन्यम (६५ ) व पती पतीयल ( ६१ ) रा.तीरुअनंतपुरम , केरळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुधा मुरगण ( ६०) व निवृत्ती सुपेकर ( ४५) हे दाघे जखमी झाले. घटनेची माहिती कळताच पीक इन्फ्राचे कर्मचारी विजय कुंडगर, शिवा कातोरे, अनिल ठाकूर, सुरेश जाधव, संदीप म्हसने, समीर चौधरी, उमेर शेख, यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.