अपघातांमध्ये दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:33 AM2018-11-12T00:33:06+5:302018-11-12T00:33:28+5:30

दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीसमोर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातांची म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Two killed in accidents | अपघातांमध्ये दोन ठार

अपघातांमध्ये दोन ठार

Next

नाशिक : दिंडोरी रोडवरील अवधूतवाडीसमोर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातांची म्हसरूळ व पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
दिंडोरीकडून नाशिककडे येत असलेल्या दुचाकीचालकास अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ उमा शिकील सहानी (४४, रा. दिंडोरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सहानी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़
अपघाताची दुसरी घटना दिंडोरीरोडवरील अवधूतवाडीसमोर घडली. भरधाव अ‍ॅक्टिवा दुचाकीच्या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला़ दिंडोरी नाक्याकडे भरधाव जात असलेल्या दुचाकीचालकाने या पादचाºयास धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी असलेल्या पादचाºयास पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

Web Title: Two killed in accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.