मधुरपाडे रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 12:48 AM2022-02-23T00:48:40+5:302022-02-23T00:49:06+5:30
मालेगाव तालुक्यातील येसगाव- मथुरपाडे रस्त्यावर भरधाव वेगात जाणा्या छोटाहत्ती टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वारासह दोन जण ठार झाले.
मालेगाव: तालुक्यातील येसगाव- मथुरपाडे रस्त्यावर भरधाव वेगात जाणा्या छोटाहत्ती टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वारासह दोन जण ठार झाले. इकराम महारिया चव्हाण (२३) रा. पांजरिया ढाबा या सेंदवा जि. बडगाव मध्यप्रदेश हल्ली मुक्काम येसगाव शिवार बापू मोतीराम शेलार यांचे मळ्यात यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी टेम्पो नं, एमएच ४१ एयू ३८३१ वरील चालक नाव गाव माहीत नाही याचे विरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. संशयिताने त्याच्या ताब्यातील टेम्पो येसगावकडून मथुरपाडेकडे चालवून नेताना समोरून येणारी दुचाकी क्र. एमएच १५ एसी ५३९९ ला धडक दिली. यात जुवानसिंग भिकला बरेला व मीना जुवानसिंग बरेला दोघे ठार झाले. दोघांच्या मरणास व दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत ठरून अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार गुजर करीत आहेत.