येवल्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 01:47 AM2021-05-01T01:47:48+5:302021-05-01T01:48:52+5:30
येवला तालुक्यातील विसापूर फाटा येथे वीज पडून दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तर गुजरखेडे येथे वीज अंगावर पडून बैल मृत्युमुखी पडला आहे.
येवला : तालुक्यातील विसापूर फाटा येथे वीज पडून दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तर गुजरखेडे येथे वीज अंगावर पडून बैल मृत्युमुखी पडला आहे.
शुक्रवारी, (दि. ३०) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील विसापूर फाटा (गोरखनगर) येथे महामार्गावरून जात असणाऱ्या दोन मोटारसायकलस्वारांवर (क्रमांक एमएच १५ जी के ७९८६) व (क्रमांक एमएच ४१ ए व्ही १०७८) वीज पडली. यात मोटारसायकलस्वार रमेश संजय गाढे (४५, रा. गिरणारे ता. देवळा), हरपालसिंग बच्चनसिंग शीख (३०, रा. मनमाड ता. नांदगाव) हे दोघे जागीच ठार झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत सुखमित हरपालसिंग शीख ही महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेस अधिक उपचारार्थ येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील गुजरखेडे येथे सीताराम तुकाराम गायकवाड यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ३०) जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने चिंता कायम आहे.