नाशिकमध्ये दोघांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:27 AM2019-08-01T02:27:35+5:302019-08-01T02:27:41+5:30

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराज जगदीश जंगम (23 रा. दिल्ली दरवाजा), रोहित पेखळे (23… रा. तिवंधा चौक) हे दोघे

Two killed in Nashik gang raid, police investigate | नाशिकमध्ये दोघांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला

नाशिकमध्ये दोघांवर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला

Next

नाशिक : जुने नाशिक येथील तिवंधा चौकात दोघा मित्रांवर संशयित चार ते पाच हल्लेखोरांनी चॉपर, लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघे युवक जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काही संशयितांची नावे समोर आली असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराज जगदीश जंगम (23 रा. दिल्ली दरवाजा), रोहित पेखळे (23… रा. तिवंधा चौक) हे दोघे रात्री जेवण करून बाहेर कट्ट्यावर गप्पा करत बसले असता संशयीत हल्लेखोर यश खैरे, गणेश खैरे, सौरभ मराठे, अशोक खैरे व त्यांचा एक साथीदार अशा पाच जणांच्या टोळक्याकडून जंगम व पेखळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी परिसरात धावपळ उडाली. हल्लेखोर तात्काळ घटनस्थलावरून फरार झालेत. जखमी अवस्थेत दोघं युवकांना परिसरातील नागरिक, नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरील पोलिस निरीक्षक दीपक रोहकले, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ, उपनिरीक्षक अनिल बागुल यांच्यासह भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी पोलीस ठाण्याचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले.  तात्काळ पाटील यांनी पथकाला हल्लेखोरांचा माग काढण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींकडे पोलीस अधिकाऱ्यांनी विचारपूस करत हल्लेखोरांची ओळख पटविली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.बजुने नाशिक परिसरातून या चार दिवसांत 10 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी तडीपार केले आहेत.

Web Title: Two killed in Nashik gang raid, police investigate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.