वाडीवऱ्हेजवळ अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:56 PM2020-11-09T23:56:56+5:302020-11-10T01:38:12+5:30

वाडीवऱ्हे : नाशिक - मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एर्ड कंपनीसमोर पिकअप आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या ...

Two killed in road mishap | वाडीवऱ्हेजवळ अपघातात दोन ठार

अपघातग्रस्त पिकअप वाहन.

Next
ठळक मुद्देचार जखमी : पिकअपचे टायर फुटल्याने लक्झरी बसला धडक




वाडीवऱ्हे : नाशिक - मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत रोथे एर्ड कंपनीसमोर पिकअप आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर चोघे जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव आणि अधरवड येथील तिघे जण महिंद्रा पिकअपने (क्र. एमएच १५ एजी ९४७७) नाशिककडून घोटीकड़े येत असताना रोथे कंपनीसमोर पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप दुभाजक ओलांडून पलीकडील मुंबईकडून इंदूरला जाणाऱ्या लक्झरी बसला (एमपी ३० पी २४७७) धडकली.
या अपघातात पिकअपमधील योगेश दामू वाजे (३५, रा. खेडभैरव आणि किरण शिवाजी बऱ्हे (३०, रा. अधरवड, ता.इगतपुरी) हे दोघे रुग्णालयात नेले असता मयत घोषित करण्यात आले, तर संदीप यशवंत केकरे (२७) हा पिकअपमधील तरुण जखमी झाला. बसमधील फ्रैंक डी. रिजारियो (रा. मुंबई), लक्झरी बसचालक रमेश दयाराम यादव, नितीन धोपटे (सर्व रा. इंदूर) हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच जगद‌्गुरू नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका आणि घोटी टोल नाका रुग्णवाहिका या अपघात स्थळी दाखल झाल्या. जखमींना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले असता योगेश दामू वाजे आणि किरण शिवाजी बऱ्हे या दोघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला आहे, तर बस बाजूला खड्ड्यात जावून आदळली. बसमधील प्रवाशी दिवाळीसाठी मुंबईहून इंदूरला चालले होते. बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते. वाडीवऱ्हे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
 

Web Title: Two killed in road mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.