येवल्यात कारमधून दोन लाखांची रोकड लंपास
By admin | Published: May 9, 2016 11:39 PM2016-05-09T23:39:41+5:302016-05-10T01:01:26+5:30
येवल्यात कारमधून दोन लाखांची रोकड लंपास
येवला : सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळ गाडीचे आॅइल गळती होत असल्याचा बहाणा करून अज्ञात चोरट्याने दोन लाख ३० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग मारु ती व्हॅनमधून लंपास केल्याची घटना घडली.
संतोष अशोक शिंदे (रा. आंचलगाव, ता. कोपरगाव) हा मारु ती व्हॅन (क्र. एमएच १५ ईपी ५१०६) गाडीतून मनमाड येथील आपल्या पाहुण्याकडून पाइपलाइनच्या कामासाठी दोन लाख रुपये घेऊन येवला येथे आला होता. दरम्यान, बँक आॅफ इंडियामधून ३० हजार रु पयांची रक्कमही काढली. मारु ती व्हॅन घेऊन दुपारी दीडच्या सुमारास संतोष शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळ फरसाण घेण्यासाठी उभा राहिला. त्याचा मित्र फरसाण घेण्यासाठी खाली उतरला. दरम्यान, २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक तरु ण गाडीत बसलेल्या संतोषजवळ आला. गाडीतून आॅइलची गळती होत असल्याचे त्याने सांगितले. आॅइल गळती पाहण्यासाठी संतोष गाडीच्या खाली उतरला व आॅइल गळतीची खात्री करण्यासाठी इंजिनच्या खाली वाकला असता या अवघ्या दोन मिनिटाच्या कालावधीत संतोषची दिशाभूल करणाऱ्या या अज्ञात चोरट्याने गाडीत ठेवलेली दोन लाख तीस हजार रुपये ठेवलेली बॅग पळविली.
या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला शहर सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांच्यासह पोलीस ताफ्याने घटनास्थळासह परिसर पिंजून काढला परंतु तपास लागू शकला नाही. सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (वार्ताहर)