कर्जमाफीसाठी दोन लाख शेतकºयांचे अर्ज?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:06 AM2017-09-24T01:06:52+5:302017-09-24T01:06:57+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज २२ सप्टेंबरच्या वाढीव अंतिम मुदतीत भरल्याचे वृत्त आहे. १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज २२ सप्टेंबरच्या वाढीव अंतिम मुदतीत भरल्याचे वृत्त आहे. १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा विचार केला तर दीड लाखांच्या आत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकरी सभासदांची संख्या जवळपास नव्वद हजारांच्या घरात असून, दीड लाखांपुढील मात्र कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकरी सभासदांची संख्या ३३ हजारांच्या घरात असल्याचे समजते. तसेच विहित मुदतीत कर्जफेड करणाºया शेतकºयांसाठीही शासनाने प्रोत्साहन योजना जाहीर केली असून, या योजनेसाठी सुमारे २५ हजार शेतकरी सभासद पात्र ठरले आहे. १२ सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्हा बॅँकेसह अन्य राष्टÑीयीकृत बॅँकामध्ये कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे १ लाख ७५ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केले होते. सुरुवातीला कर्जमाफीसाठी असलेली अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र नंतर शासनाने ही मुदत वाढवून २२ सप्टेंबर केली होती. या वाढीव मुदतीत दोन लाखांहून अधिक पात्र शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बहुतांश वेळ आॅनलाइन अर्ज भरण्याचे सर्व्हर डाउन असल्याच्या तक्रारी सर्व ठिकाणांहून येत होत्या. त्यामुळेच शासनाने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी वाढवून दिल्याची चर्चा होती.