रिक्षामधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे दागिणे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:55 PM2018-09-13T15:55:10+5:302018-09-13T16:05:06+5:30

रिक्षामध्ये त्यांच्यासोबत सहप्रवाशी अंदाजे ४० ते ४५ वर्षाची अज्ञात महिला बसलेली होती. त्या महिलेने लवाटे यांची दागिण्यांची पर्स हातचलाखीने त्यांची नजर चुकवून ताब्यात घेत रिक्षामधून उतरुन पोबारा केला.

Two lakh jewelery worth lakhs of people traveling in a autorickshaw lamps | रिक्षामधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे दागिणे लंपास

रिक्षामधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे दागिणे लंपास

Next
ठळक मुद्दे१ लाख ८३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे अज्ञात सहप्रवाशांसोबत संवाद टाळावा

नाशिक : रविवार कारंजा येथून नवश्या गणपतीजवळ राहत्या घरी रिक्षामधून जात असताना भाग्यश्री आनंद लवाटे (७०, रिव्हरसाईट अपार्टमेंट) यांची दागिणे असलेली पर्स शेजारी बसलेल्या सहप्रवाशी महिलेने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या पर्समध्ये सुमारे १ लाख ८३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे होते, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लवाटे या रविवार कारंजा येथून आनंदवल्ली शिवारातील राहत्या घरी जाण्यासाठी बुधवारी (दि.१२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास रिक्षामध्ये बसल्या. रिक्षामध्ये त्यांच्यासोबत सहप्रवाशी अंदाजे ४० ते ४५ वर्षाची अज्ञात महिला बसलेली होती. त्या महिलेने लवाटे यांची दागिण्यांची पर्स हातचलाखीने त्यांची नजर चुकवून ताब्यात घेत रिक्षामधून उतरुन पोबारा केला. या पर्समध्ये दोन सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, सोन्याची लहान मण्यांची एक माळ असे एकूण सुमारे दोन लाखांचे दागिणे होते. याप्रकरणी लवाटे यांनी सांगितलेल्या वर्णनाच्या अज्ञात महिलेविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरिक्षक पाळदे करीत आहेत. रिक्षा प्रवास किंवा बसमधून प्रवास करताना महिलांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनोळखी, अज्ञात सहप्रवाशांसोबत संवाद टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. रिक्षामध्ये किंवा बसमधून प्रवास करताना आजुबाजूला असलेल्या सहप्रवाशांपासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. महिला सहप्रवाशाकडुनदेखील दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे अशा अनेक घटनांमधून पुढे आले आहे.

Web Title: Two lakh jewelery worth lakhs of people traveling in a autorickshaw lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.