वडाळागाव परिसरात दररोज दोन लाख लिटर पाण्याची चोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:00 AM2019-05-21T00:00:21+5:302019-05-21T00:06:45+5:30

नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख  लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा पाणी चोरांनी उचलला आहे.

 Two lakh liters of water every day in Wadalgaon area? | वडाळागाव परिसरात दररोज दोन लाख लिटर पाण्याची चोरी?

वडाळागाव परिसरात दररोज दोन लाख लिटर पाण्याची चोरी?

Next

इंदिरानगर : नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख  लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा पाणी चोरांनी उचलला आहे.
वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता त्याची जागा आता घरांनी घेतली असून, परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर या परिसरांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ९० टक्के नागरिकांनी जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी केली आहे. तर जवळपास दोन हजार घरांमध्ये अनधिकृत जोडणी करून घेतली आहे. अनधिकृतपणे नळजोडणीतून महापालिकेच्या पाण्याचा वापर केला जात आहे.
नाशिक शहरात अशाप्रकारे अनधिकृत नळजोडणीतून सुमारे साडेचार लाख लिटर पाण्याची चोरी होत असताना एकट्या वडाळागावात गेल्या सात ते आठ वर्षांपासून दोन लाख लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. एवढ्यावरच या भागातील पाणीप्रश्न भागत नसून, अपुºया पाण्याची ओरड करून या भागात टॅँकरद्वारेदेखील पाणीपुरवठा करावा लागत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अनधिकृत नळजोडणी तोडण्यास असमर्थ असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Web Title:  Two lakh liters of water every day in Wadalgaon area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.