मोहाडीत दोन लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 03:47 PM2020-01-24T15:47:10+5:302020-01-24T15:47:45+5:30
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील सप्तशृंगी वेल्डिंग वर्क्सचे संचालक शिवाजी ढेपले यांच्या राहत्या घरी भर वस्तीत धाडसी चोरी झाल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील सप्तशृंगी वेल्डिंग वर्क्सचे संचालक शिवाजी ढेपले यांच्या राहत्या घरी भर वस्तीत धाडसी चोरी झाल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढेपले हे धार्मिक कार्यक्र मासाठी अंतापुर-ताराबाद येथे गेले होते. या दरम्यान रात्रीच्या सुमारास भर वस्तीतून धाडशी चोरी झाली. ढेपले कुटुंबासह अंतापुर ताराबाद येथे दावल मलिक देवस्थानात आयोजित धार्मिक कार्यक्र मासाठी गेले होते. कार्यक्रमाहून घरी परत आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात जाऊन बघितल्यावर मधल्या रूममधील दोन्ही कपड्यांचे लॉकर उचकटलेले होते. देव्हार्याचे ड्राव्हर उचकटून काढून बाहेर घेतलेली दिसले. कपाटात मध्ये ठेवलेले दागिने, सोन्याची चैन, नेकलेस, झुबे, पन्नास मनी, चांदीचे जोडवे किंमत अंदाजे दोन लाख व रोख रक्कम पंधरा हजार असे एकूण दोन लाख पंधरा हजार रु पये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत दिंडोरी पोलिस, ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरु ण आव्हाड, हवालदार शंकर जाधव, दिलीप पगार व युवराज खांडवी आदी करत आहे.गुन्ह्याची तात्काळ चौकशी करून चोरट्यांना बंदिस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद माजी शिवसेना गटनेते प्रवीण जाधव, मोहाडीचे सरपंच राजाराम जाधव, उपसरपंच रत्ना क्षीरसागर यांनी केली आहे.