दोन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:20 AM2018-10-18T00:20:38+5:302018-10-18T00:21:05+5:30
शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ म्हसरूळ व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़
नाशिक : शहरातील दोन विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ म्हसरूळ व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावर घडली आहे़ वरद बंगल्यातील रहिवासी विजय वझे हे कुटुंबीयांसह बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील वीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याचे नाणे, वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे वाळे, दहा हजार रुपयांचे सोन्याचे नाणे असा ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची दुसरी घटना देवळाली कॅम्प परिसरात घडली़ सेवानिवृत्त सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल निर्मला ए. परमार यांच्या बंद बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ तसेच घरातील ३० हजार रुपये किमतीचे नेकलेस, १९ हजार रुपयांच्या कानाच्या रिंगा असे ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले़