दोन बिबटे जेरबंद तर एकाचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:59 PM2018-10-29T15:59:51+5:302018-10-29T16:00:02+5:30

सिन्नर : टंचाईची तीव्रता जाणवू लागताच सिन्नर तालुक्यात जंगलातील बिबट्यांनी मानवी वस्तीकडे कूच सुरु केली आहे. पाणी व भक्ष्याचा शोधार्थ बिबटे जंगलाबाहेर पडू लागल्याने बिबट्याचा संचार वाढल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात दिसू लागले आहे. रविवारी रात्री वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन करीत घोरवड व दापूर शिवारातून दोन बिबटे जेरबंद केले तर एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना देवपूर शिवारात सोमवारी सकाळी उडकीस आली.

 Two leopard jerks and one drowned in the well | दोन बिबटे जेरबंद तर एकाचा विहिरीत पडून मृत्यू

दोन बिबटे जेरबंद तर एकाचा विहिरीत पडून मृत्यू

Next
ठळक मुद्देदापूर शिवारात बिबट्या शौचाालयात शिरल्यानंतर वनविभागाने रेस्क्यू करीत त्यास जेरबंद केले तर दुसरी घटना घोरवड-शिवडे शिवारात घडली. कांद्याच्या चाळीत ठेवलेल्या कोंबड्यांना भक्ष्य बनविण्यासाठी आत शिरलेल्या बिबट्यास शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून कोंडून ठेवत वनवि


सिन्नर : टंचाईची तीव्रता जाणवू लागताच सिन्नर तालुक्यात जंगलातील बिबट्यांनी मानवी वस्तीकडे कूच सुरु केली आहे. पाणी व भक्ष्याचा शोधार्थ बिबटे जंगलाबाहेर पडू लागल्याने बिबट्याचा संचार वाढल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात दिसू लागले आहे. रविवारी रात्री वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन करीत घोरवड व दापूर शिवारातून दोन बिबटे जेरबंद केले तर एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना देवपूर शिवारात सोमवारी सकाळी उडकीस आली. अचानक बिबट्यांचा संचार वाढल्याने वनविभागाची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे.

सिन्नर-दापूर रस्त्यालगत बेलगाय वस्ती आहे. भक्ष्याच्या शोधात सुमारे वर्षभराचा बिबट्या शंकर निवृत्ती आव्हाड यांच्या शेतात वस्तीबाहेर असलेल्या बाथरुममध्ये येऊन बसला. पहाटेच्या सुमारास शेतकरी बाथरुमकडे गेल्यानंतर बिबट्याने शेजारीच असलेल्या शौचालयात आश्रय घेतला. सदर बिबट्या थकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्याने फारशी हालचाल न केल्याने शेतकºयांनी तातडीने सिन्नरच्या वनविभागास घटनेची माहिती दिली. बिबट्या थकलेल्या अवस्थेत असल्याने शेतकºयांनी शौचालयाच्या बाहेर जाळी लावली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी ए. बी. साळवे, पी. ए. सरोदे, बी. व्ही. तुपलोंढे, के. आर. इरकर, गोरख पाटील, पी. बी. साळुंके, पंडीत आगळे यांच्या वनकर्मचाºयांनी घटनास्थळी जावून रेस्क्यू आॅपरेशन केले. बिबट्याला भूल दिल्यानंतर त्यास जेरबंद करण्यात आले.
दुसरी घटना घोरवड-शिवडे शिवारात घडली. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाºयांनी दूरध्वनीद्वारे बिबट्या कांद्याच्या चाळीत अडकल्याचा निरोप आला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांच्यासह वनकर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. घोरवड शिवारातील सागाडी मळा परिसरात सुदाम गांजवे यांच्या घराशेजारील कांदाचाळीत अचानक रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्या शिरला. कांदा चाळीमध्ये कोंबड्या असल्याने बिबट्या चाळीत शिरला असल्याची शक्यता आहे. विशाल गांजवे हा लाईट सुरू करण्यासाठी चाळीत गेला असता, बिबट्या त्याच्यावर गुरगुरला. त्यानंतर विशालने कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. अर्धवट असलेल्या जाळीच्या संरक्षण भिंतीवरून बिबट्याने चाळीत प्रवेश केला होता. गांजवे कुटुंबीयांनी कांदा चाळीच्या त्या अर्धवट जाळीवर काटेरी झुडपे व लोखंडी पलंग टाकून बिबट्याला बाहेर पडण्याचा रस्ता बंद केला. यानंतर वन विभागाच्या अधिकाºयांना माहिती देण्यात आली. वनकर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्या बेशुद्ध झाला. तत्पूर्वी बिबट्याने चार कोंबड्या फस्त केल्या होत्या. पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून मोहदरी येथील वनउद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आला.
दोन बिबट्या रेस्क्यू आॅपरेशन करुन जेरबंद होता ना होता तोच सोमवारी सकाळी देवूपर शिवारात विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली. देवपूर शिवारातील दिनकर रंगनाथ वाणी यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे सकाळी १० वाजेच्यास ु सुमारास निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक एस. बी. थोरात, के. आर. इरकर, पी. एल. बिन्नर, विनोद जवाडे, सोमनाथ काढवे, तुकाराम डावरे, एम. व्ही. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे ३० फूट खोल विहिरीस फक्त ४ फूट पाणी होते. मात्र बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वनविभागाने शेतकºयांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने मृत बिबट्याला बाहेर काढले. सुमारे दोन ते अडीच वर्षाची मादीचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. मृत बिबट्यास विहिरीबाहेर काढल्यानंतर पशवैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन केल्यानंतर अग्निडाग देण्यात येणार होता.

Web Title:  Two leopard jerks and one drowned in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.