गोदापात्रात बुडून दोन बिबटे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:18 AM2021-01-19T04:18:03+5:302021-01-19T04:18:03+5:30

निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वरजवळ गोदावरी नदीच्या पुलाला लागून असलेल्या नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. याच ठिकाणाहून रात्रीच्या अंधारात भक्ष्याचा ...

Two leopards drown in Godapati | गोदापात्रात बुडून दोन बिबटे मृत्युमुखी

गोदापात्रात बुडून दोन बिबटे मृत्युमुखी

Next

निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वरजवळ गोदावरी नदीच्या पुलाला लागून असलेल्या नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. याच ठिकाणाहून रात्रीच्या अंधारात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटया नर-मादी गाळामध्ये अडकून पडल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. गाळामध्ये दोन्हीही अडकल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. गाळातून बाहेर पडण्याचा या बिबट्याच्या जोडीने प्रयत्नही केल्याचे घटनास्थळाच्या पाहणीतून दिसून आले; मात्र त्यांना अखेरपर्यंत यश न मिळाल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन या नर-मादी बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सकाळी दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बिबट्यांचे मृतदेह वनरक्षकांनी गाळातून बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी नैताळे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले असता फुफ्फुसामध्ये पाणी जाऊन गुदमरून या बिबट्यांचा मृत्यू रविवारी रात्री झाला असावा असा निष्कर्ष त्यांनी दिल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. शवविच्छदेनानंतर या दोन्ही बिबट्यांच्या मृतदेहांवर तारुखेडले येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

---इन्फो--

नव्या वर्षात पहिली दुर्घटना

नवीन वर्ष उजाडल्यानंतर वन्यजीव हानीची ही पहिली दुर्घटना आहे. या दोन प्रौढ बिबट्यांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे वन्यजीव प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही प्रौढ बिबटे अपघातात गमवावे लागले. नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याचा परिसर समृध्द जैवविविधता आणि अन्नसाखळीसाठी ओळखला जातो. या ठिकाणी फुलपाखरांपासून वन्यप्राण्यांपर्यंत विविध प्रकारची जैवविविधता अधिकाधिक समृध्द आहे.

-----

फोटो आर वर १८बिबट्या१/२ नावाने सेव्ह

Web Title: Two leopards drown in Godapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.