कोनांबे येथे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:08 AM2019-09-06T00:08:53+5:302019-09-06T00:11:44+5:30

सिन्नर : महामार्गासाठी मुरूम व दगड काढल्यानंतर तयार झालेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४.१५ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कोनांबे परिसरात घडली.

Two men drowned in a lake in Konambe | कोनांबे येथे तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

विजय मधुकर वारु ंगसे

Next
ठळक मुद्देमहार्गासाठी लागणाऱ्या खडीचे उत्पादनदेखील याच ठिकाणी करण्यात येते.

सिन्नर : महामार्गासाठी मुरूम व दगड काढल्यानंतर तयार झालेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४.१५ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील कोनांबे परिसरात घडली.
कोनांबे शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून, महार्गासाठी लागणाऱ्या खडीचे उत्पादनदेखील याच ठिकाणी करण्यात येते. त्यासाठी लागणारा दगड जमिनीतून काढल्याने तेथे तळे तयार झाले आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसाने हे तळे पूर्ण भरले असून सोनांबे येथील विजय मधुकर वारु ंगसे (१९), गणेश भास्कर वारुंगसे (१९) हे सोनांबे येथील युवक गुरुवारी दुपारी कोनांबे येथील तळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. दोघांनीही काठावर कपडे काढून पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. सदर प्रकार त्यांच्यासोबत असलेल्या चुलत भावाच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून समृद्धी महामार्गाच्या कामावरील सुरक्षारक्षक धावत आला. मात्र, त्यापूर्वीच दोघेही बुडाले होते. परिसरातील नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सिन्नर नगर परिषद अग्निशमन दलाचे जवान व पांढुर्ली येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले. सुमारे दीड ते दोन तासाच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह हाती लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार एच. ए. गोसावी, रामदास जाधव, बाबा पगारे, किरण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह सिन्नर नगरपालिका रु ग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Web Title: Two men drowned in a lake in Konambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात