दोघे अल्पवयीन मित्र गंगातपूर धरणा बुडून मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:37+5:302021-04-06T04:14:37+5:30

--- नाशिक : गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सहा ते सात मित्रांच्या ग्रुपमधील दोन अल्पवयीन शाळकरी मित्रांचा जलाशयात सोमवारी ...

Two minor friends drowned in Gangatpur dam | दोघे अल्पवयीन मित्र गंगातपूर धरणा बुडून मृत्युमुखी

दोघे अल्पवयीन मित्र गंगातपूर धरणा बुडून मृत्युमुखी

Next

---

नाशिक : गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सहा ते सात मित्रांच्या ग्रुपमधील दोन अल्पवयीन शाळकरी मित्रांचा जलाशयात सोमवारी (दि. ५) संध्याकाळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे.

कोरोनामुळे सध्या शाळांना सुटी असल्याने सोमवारी सकाळी जुन्या नाशकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकींवरून भटकंतीकरिता बाहेर पडला. सावरगावमार्गे हे सगळे मित्र गंगापूर धरणावर पोहोचले. संध्याकाळी सूर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख (१६), साबीर सलीम शेख (१५, दोघे रा. खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे जलाशयात कोसळले. एकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला; मात्र पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रदेखील धावले; मात्र तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडालेले होते. मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिक युवक नागरिकांना सांगून मदतीला बोलावले. काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात सूर लगावत दोघांना बाहेर काढण्यासाठी शोध सुरू केला. सुमारे अर्ध्या तासानंतर कैफ आणि साबीर यांचे मृतदेह हाती आले. त्यांच्या मृत्यूने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील शाळकरी मुले होती. काही वर्षांपूर्वी कैफचे पितृछत्रदेखील हरपले. त्याच्या पश्चात आई, मोठी बहीण, भाऊ असा परिवार आहे.

---

फोटो nsk edit वर पाठविले आहेत

Web Title: Two minor friends drowned in Gangatpur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.