नाशिकमधील २ महिलांसह अल्पवयीन मुलाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:04 AM2018-02-22T06:04:27+5:302018-02-22T06:04:31+5:30
संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नाशिकमधील २ महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात मंगळवारी अटक केली.
ठाणे : संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नाशिकमधील २ महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात मंगळवारी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी ठाण्यातील २ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या अंगझडतीत सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक दोघींना कल्याण रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या विरोधात पेण रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाण्यातील रेल्वे प्रवासादरम्यान पर्समधून दागिने चोरीच्या २ घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. तक्रारदारांनी केलेल्या वर्णनानुसार, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांच्या निर्भया पथकामार्फत शोध सुरू असताना, मंगळवारी या पथकाने ठाणे एसटी स्थानकाच्या जवळ संशयास्पदरीत्या फिरणाºया वैशाली विजय साळुंखे (३५ ), चांगुणा विक्र ांत भोसले (२२) आणि एक १३ वर्षीय अलपयीन मुलगा अशा तिघांना (राहणार, भीमनगर, पंचवटी, नाशिक) ताब्यात घेतले.
त्यांच्या चौकशीत त्यांनी ठाण्यातील २ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या अंगझडतीत एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्या दोघींना बुधवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.