नाशकात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग ;पोक्सो अंतर्गत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 07:15 PM2020-01-17T19:15:51+5:302020-01-17T19:24:19+5:30
नाशिक शहरातील मुंबई नाका व पंचवटी परिसरात बुधवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार (पोक्सो ) कायर्द्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक : शहरातील मुंबई नाका व पंचवटी परिसरात बुधवारी एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्याचे समोर आले असून या दोन्ही प्रकरणांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचार (पोक्सो ) कायर्द्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विनयभंगाच्या घटनांमुळे शहातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात मुंबई नाका व पंचवटी पोलीस ठाण्यांमध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस तपात करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंडवाडीरोड क्रांतिनगर भागातील एका दुकानात गेलेल्या मुलीला संशयिताने लाडू खायला देऊन शरीराला स्पर्श करीत विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने संशयिताविरोधात दिलेल्या फियादीनुसार मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पंचवटीतील हरीबाई चाळ येथे एका संशयित आरोपीने फिर्यादी महिलेला इंदिराकुंडजवळील म्हसोबा मंदिरापर्यंत ओढत नेऊन रिक्षात बसवून विनयभंग केला. याप्रकरणी पीडितीने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.