नांदूरवैद्य येथे पुन्हा दोन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 02:40 PM2020-07-16T14:40:49+5:302020-07-16T14:41:23+5:30
नांदूरवैद्य-: इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढतच आहे. येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्ण आढळले असून याच पाशर््वभूमीवर सोमवारी नांदूरवैद्य येथे एका ४५ वर्षीय पुरु ष कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आला होता.
नांदूरवैद्य-: इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढतच आहे. येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्ण आढळले असून याच पाशर््वभूमीवर सोमवारी नांदूरवैद्य येथे एका ४५ वर्षीय पुरु ष कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आला होता. सदर रूग्णाच्या संपर्कात असलेल्या सात जणांना होमक्वारांटाईन करण्यात आले होते. या होमक्वारांटाईन केलेल्या व्यक्तींपैकी आज गुरूवारी (दि.१६) रोजी एका २४ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझििटव्ह आला आहे. तसेच पुन्हा एक ४१ वर्षीय पुरु ष नवीन रु ग्णाचा अहवाल पॉझििटव्ह आल्यामुळे नांदूरवैद्य येथील कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत दोन रूग्णांची वाढ झाल्याने ती संख्या आत्तापर्यंत पाच अशी झाली आहे. नांदूरवैद्य येथे गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींपैकी एका २४ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझििटव्ह आल्यामुळे तसेच पुन्हा नव्याने एक ४१ वर्षीय रु ग्ण आढळल्यामुळे नांदूरवैद्य येथे खळबळ माजली असून संपूर्ण गाव याआधीच १४ दिवसांकरिता बंद करण्यात आले आहे. संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यानंतर इगतपुरी तालुका आरोग्य विभागाचे इगतपुरी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. एम.बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूरवैद्य येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक हितेश घरटे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र सपकाळ, आरोग्यसेविका मंगला कणसे, अंगणवाडी सेविका सुमन मुसळे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे, आशा काजळे आदींनी तपासणी करून सदर नवीन पॉझििटव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रु ग्णाच्या घरातील नऊ जणांना होम क्वारांटाईन करण्यात आले आहे. इगतपुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख यांनी ग्रामस्थांना कोरोनाकाळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.