आणखी दोन दिवस उष्माघात

By admin | Published: March 28, 2017 12:41 AM2017-03-28T00:41:31+5:302017-03-28T00:41:55+5:30

नाशिक : हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने विभागातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या

Two more days of heatstroke | आणखी दोन दिवस उष्माघात

आणखी दोन दिवस उष्माघात

Next

नाशिक : हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नाशिकसह विभागातील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या असून, त्यासाठी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शनही केले आहे.  गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह मध्य महाराष्ट्रात उष्मालाट आली असून, तपमानाने चाळीशी पार केल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक हरतऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहेत.  येत्या ४८ तासांत उष्णतेची लाट अशीच कायम राहील किंबहुना त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
वाढत्या उष्मेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याचेही आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.
काय करावे
तहान लागली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे
हलकी व पातळ सच्छिद्र सुती कपडे वापरावीत
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करावा
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
शरीरातील पाणी कमी झाल्यास लस्सी, लिंबू पाणी, ताक याचा वापर करावा
अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जावे
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात
जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
काय करू नये
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळा.
गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
बाहेर तपमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत बाहेर काम करणे टाळावे
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.
मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवावीत.

Web Title: Two more days of heatstroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.