जिल्ह्यात आणखी दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:36 AM2018-11-24T01:36:07+5:302018-11-24T01:36:30+5:30
नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, लागोपाठ दोन दिवस दोघा शेतकºयांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात आजवर आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.
बागलाण तालुक्यातील खामलोण येथे राहणारे रामदास गंगाराम धोंडगे (४९) यांनी बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे गट क्रमांक २४०/१चे १.७५ क्षेत्र आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठल्याही बॅँकेचा बोजा नसल्याचे तलाठ्याचे म्हणणे आहे, तर मालेगाव तालुक्यातील साकुरी नि. येथील शिवाजी पुंडलिक धोंडगे यांचा मुलगा रवींद्र शिवाजी धोंडगे (३०) याने गेल्या शनिवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यवस्थस्थितीत त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी निधन झाले. या घटनेत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दोघांच्या मृत्यूने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९५ झाली आहे.