नाशिकमधील आणखी दोन माजी नगरसेवक शिंदे सेनेत; आत्तापर्यंत सुमारे २५ जण दाखल

By संजय पाठक | Updated: February 13, 2025 14:33 IST2025-02-13T14:32:22+5:302025-02-13T14:33:04+5:30

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिकमध्ये येणार असून सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

Two more former corporators from Nashik join Shinde Sena around 25 people have joined till now | नाशिकमधील आणखी दोन माजी नगरसेवक शिंदे सेनेत; आत्तापर्यंत सुमारे २५ जण दाखल

नाशिकमधील आणखी दोन माजी नगरसेवक शिंदे सेनेत; आत्तापर्यंत सुमारे २५ जण दाखल

संजय पाठक, नाशिक- महापालिका निवडणूकीच्या पाश्व'भूमीवर शिंदे सेनेने आक्रमक भूमिका घेत अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना प्रवेश देण्याचा सपाटा सुरूच ठेवला असून आज सातपूर येथील मनसेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि उध्दव सेनेत असलेले माजी नगरसेवक पवन पवार यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्याच प्रमाणे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांनीही देखील पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे सेनेचे शिवबंधन बांधले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिकमध्ये येणार असून सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यावेळी उध्दव सेनेचे अनेक जिल्हा आणि शहर पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांचा प्रवेश सोहळा हेाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत केले.

यावेळी शिंदे सेनेचे सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, माजी नगरसेवक विक्रम नागरे उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीत असताना काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या आणि प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील तसेच उध्दव सेनेत असलेल्या माजी उपमहापौर रंजना बोराडे, माजी नगरसेवक दिपक दातीर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला हेाता. आता आणखी दोघांचे प्रवेश झाले आहे.

Web Title: Two more former corporators from Nashik join Shinde Sena around 25 people have joined till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.