नाशिकमध्ये कोरोनाचे आणखी दोन संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 04:47 PM2020-03-10T16:47:55+5:302020-03-10T16:52:31+5:30
नाशिक- दुबई येथून परतलेल्या मुलीला आणि तीच्या आईला आज संशयित कोरोना रूग्ण म्हणून नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅप घेण्यात आले असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

नाशिकरोड येथील सदर १९ वर्षांची युवती काही दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आली होती. नाशिक महापालिकच्या बिटको रूग्णालयात या युवतीची आई परीचारीका असून तीला त्रास होऊ लागल्याने आज सकाळीच याच रूग्णालयातील डॉक्टरांना दाखवण्यात आले. यावेळी त्या महिलीची मुलगी दुबईहून आल्याचे कळाल्यानंतर महापालिकेने जिल्हा शासकिय रूग्णालयाल कळवले. जिल्हा रूग्णालयाच्या पथकाने बिटको रूग्णालयात येऊन या दोघी मायलेकींना दाखल केले. सदरची युवती दुबईतून आल्याने तीला दाखल करून घेतानाच तीच्या आईवरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघींचे स्वॅप घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी (दि.११) त्याचा अहवाल प्राप्त होईल.
दरम्यान, विदेशातून कोणीही नाशिकमध्ये दाखल झाल्यास तातडीने जिल्हा रूग्णालयाला माहिती देऊन त्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.