बारा तासांत दोन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:41 AM2017-08-29T01:41:29+5:302017-08-29T01:41:34+5:30

Two murders in twelve hours | बारा तासांत दोन खून

बारा तासांत दोन खून

Next

नाशिक : टोळीयुद्ध आणि खुलेआम दहशत पसरविण्याच्या घटनांमुळे शहर परिसरात गेल्या आठ महिन्यांत खुनाच्या २९ घटना घडल्या आहेत. गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोक्का आणि तडीपारीसारख्या कारवाया केल्या असल्या तरी शहरातील खूनसत्र सुरूच असून, गेल्या बारा तासांत खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. सातपूर येथे एका विक्रेत्याचा, तर भद्रकाली येथे एका गर्दुल्याचा खून झाल्याच्या घटना घडल्या.
सातपूरमध्ये विक्रेत्याची हत्या
सातपूर : पूर्ववैमनस्य तसेच कुरापत काढून अंडारोल विक्रेत्यावर चौघांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (दि़२७) रात्रीच्या सुमारास सातपूर येथील स्वारबाबानगरमध्ये घडली़ धनराज उर्फ कुणाल राजू परदेशी (३२, रा़आयटीआय सिग्नलजवळ, साळुंकेनगरच्या मागे, खुटवडनगर, नाशिक) असे खून झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे़ या खुनानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना पिंपळगावजवळ पाठलाग करून अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, खून झालेल्या व केलेल्या संशयितांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़
पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत धनराज परदेशी हा आयटीआय पुलाजवळ अंडारोल विक्रीचा व्यवसाय करीत होता़ रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याचे मित्र संशयित भूषण बाळासाहेब कदम (२७, रा़आकाश रेसिडेन्सी, रो-हाउस नंबर ४, साळुंखेनगर, खुटवडनगर, सिडको), अजिंक्य दत्तात्रय गायकवाड (२१, रा़ वावरेनगर, वावरे प्लाझा, खुटवडनगर), नरेश हिरालाल ठाकरे (२३, शिवशक्तीनगर, नवजीवन शाळेमागे, सिडको) व आकाश दौलत दातीर (रा़ खुटवडनगर, नाशिक) यांनी धनराज परदेशी यास घरातून बोलावून घेतले़ यानंतर स्वारबाबानगरमधील आंबेडकर चौकात नेऊन कुरापत काढून धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, पोटावर वार करून फरार झाले़ गंभीर जखमी धनराज याचा भाऊ आकाश याने पोलिसांना घटनेची माहिती देताच गुन्हे शोध पथकाच्या वाहनातून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचारादरम्यान धनराज परदेशी याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी घोषित केले़ याप्रकरणी आकाश परदेशीच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर फरार संशयितांच्या शोधासाठी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी आरोपींचे मोबाइल नंबर मिळवून त्यांचे लोकेशननुसार पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, पोलीस हवालदार डी़ के.पवार, पोली नाईक तुपे यांचे पथक तयार करून शोधासाठी पाठविले़ पिंपळगावपासून काही अंतरावर असलेले संशयित गायकवाड, कदम, ठाकरे व दातीर यांनी पोलिसांना पाहताच पलायनाचा प्रयत्न केला असता त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले़
मयत धनराज उर्फ कुणाल परदेशी व हल्लेखोर भूषण कदम यांच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे़ हे दोघेही एकमेकांचे मित्र असून, कदम यालाही अंडारोलचा व्यवसाय करावयाचा असल्याने या दोघांमध्ये वाद झाला व कदमने आपल्या साथीदांरासह परदेशीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे तपासात समोर आले आहे़ संशयित व परदेशी यांचा वाद सुरू असताना धनराज याचा भाऊ आकाश हा कुणालला घरी चलण्यास सांगत होता, मात्र त्यानंतर लगेचच संशयितांनी वार करून फरार झाले़
- श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपायुक्त, नाशिक़

Web Title: Two murders in twelve hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.