दरोड्याच्या तयारीतील दोघे जाळ्यात

By admin | Published: November 6, 2015 11:46 PM2015-11-06T23:46:26+5:302015-11-06T23:46:58+5:30

दरोड्याच्या तयारीतील दोघे जाळ्यात

The two nets are prepared for the dacoity | दरोड्याच्या तयारीतील दोघे जाळ्यात

दरोड्याच्या तयारीतील दोघे जाळ्यात

Next


सिडको : येथील सूर्योदय कॉलनीत रहिवाशी राजकुमार बाफणा यांच्या घरात वीस लाख रुपयांची रोकड असल्याची टिप चोरट्यांना देऊन यातून सख्ख्या काकालाच गंडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टर माइंडसह दोघा चोरट्यांना अंबड पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलने पाठलाग करुन पकडले.
सिडकोतील सावतानगर भागातील सूर्योदय कॉलनीत राजकुमार बाफणा हे कुटुंबीयांसमवेत राहतात. गेल्या गुरुवारी (दि. ५) रोजी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरी पत्नी, मुलगा व मुलगी सिद्धी होते. त्यांच्या घरी राजकुमार यांच्या सख्ख्या भावाचा मुलगा पंकज कायम ये-जा कारीत असे. गेल्या काही दिवसांपासून पंकज हा जुगार तसेच व्यसनाधीन झाला असून, यात तो कर्जबाजारीही झाला. यामुळे त्यास पैशाची गरज भासू लागली. आपले काका हे सरकारी ठेकेदार असल्याने पंकजने काकांच्याच पैशावर डल्ला मारण्याची तयारी केली. यासाठी त्याने काका गावाला गेल्याची संधी साधली. पंकजने काका गावाला गेल्यावर सायंकाळी त्यांच्या घरी आला व काकांच्या मुलास बरोबर घेऊन गेला. यानंतर घरात राजकुमार यांच्या पत्नी व अकरा वर्षाची मुलगी सिध्दी होती. पंकजने याचा फायदा घेत दोन चोरट्यांना हाताशी धरत चोरी करण्याची तयारी केली. यात पंकजने काका गावाला गेल्याने त्यांच्या घरातील रोकड लंपास करण्यासाठी दोघा चोरट्यांनाच हाताशी धरले. या चोरट्यांनी गेल्या गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास राजकुमार बाफणा यांच्या घरात घुसले. त्यांनी घरात असलेल्या आरती बाफणा यांना चाकूचा धाक दाखविला व त्यांना दोरीने बांधून ठेवले. यानंतर त्यांनी घरातील वीस लाख रुपयांची रोकड शोधऱ्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान त्यांची मुलगी घराबाहेर खेळत होती ती घरात येण्यासाठी दरवाजा वाजवला. यामुळे चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात गर्दी झाली याच दरम्यान या भागात पेट्रोलिंग करीत असलेले अंबड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विष्णू दामू गावित व राजाराम तुळशीराम गांगुर्डे यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पलायन करीत असलेल्या दोघा चोरट्यांना पाठलाग करुन पकडले. यांची चौकशी केली असता अक्षय देशमुख (रा. लासलगाव) व दुसरा राहुल चौधरी (रा. जळगाव) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघा चोरट्यांना घरात फक्त सह हजार रुपयांची रोकड मिळाली. या दोघा चोरट्यांनीच माहिती देताना सांगितले की, बाफणा यांच्याच पुतण्याने चोरी करण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. यावरून दोघा चोरट्यांसह पंकज यास अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.


पुतण्याने केला घात

  • राजकुमार बाफणा यांचा पुतण्यानेच घात करण्याचा प्रयत्न केला. पुतण्या पंकज बाफणा हा नियमित काकाच्या घरी येत असे. पुतण्या पंकज असे काही कृत्य करेन, अशी यात किं चितही माहिती राजकुमार बाफणा यांना नव्हती; परंतु गेल्या काही दिवसांपासून पंकज हा जुगार व व्यसनाधीन झाल्याने कर्जबाजारी झाला होता. यातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस उपायुक्तश्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
  • अंबड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विष्णू गावित व राजाराम गांगुर्डे यांनी दाखविलेल्या धाडसामुळेच गुन्हा घडण्याआधीच उघडकीस आला. अक्षय देशमुख व राहुल चौधरी हे दोघे चोरटे पलायन करीत असतानाच दोघे बीट मार्शल पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा धाडसाने पाठलाग करून त्यांना पकडले. या दोघा बीट मार्शलचा पोलीस उपायुक्त यांनी सत्कार केला.

 

Web Title: The two nets are prepared for the dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.