‘कोरोना’ विलगीकरण कक्षात दोन नवे संशयित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 08:02 PM2020-03-16T20:02:01+5:302020-03-16T20:04:25+5:30

जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल असलेल्या पाच संशयितांच्या घशांचे स्त्राव घेऊन ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. तसेच जुन्या तीन रूग्णांचे नमुने सोमवारी रात्रीपर्यंत प्राप्त झालेले नव्हते

Two new suspected patients in the 'Corona' isolation room | ‘कोरोना’ विलगीकरण कक्षात दोन नवे संशयित रूग्ण

‘कोरोना’ विलगीकरण कक्षात दोन नवे संशयित रूग्ण

Next
ठळक मुद्देसध्या या कक्षात एकूण ५ रूग्णांवर उपचार सुरू २१ नमुने निगेटीव्ह प्राप्त झाले नव्या रूग्णांमध्ये एका महिलेसह मुलीचा समावेश

नाशिक : शहरात कोरोनाबाधित देशांमधून अद्याप ४२ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. त्यांच्यापैकी २३ संशयित रूग्णांना दाखल करून घेण्यात आले. त्यांच्या घशाच्या स्त्रावचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी २१ नमुने निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. उर्वरित दोघांचे नमुने अद्याप जिल्हा शासकिय रूग्णालयाकडे सोमवारी (दि.१६) रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेले नाही. दरम्यान, सोमवारी दोन संशयित महिला रूग्णांची कोरोना विलगीकरणी कक्षात नव्याने भर पडली. सध्या या कक्षात एकूण ५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांचे नमुने तपासणीकरिता पुण्याला पाठविण्यात आले आहे.
शहरात कोरोनाबाधित देशांमधून येणाऱ्या नागरिकांचे महापालिकेच्या शहरी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करून त्यांना देखरेखीखाली घरांमध्येत क्वारंटाईन करण्यात येत आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांमधून आलेल्या नागरिकांना (कुठलाही त्रास होत नसला तरी) तपोवनातील महापालिकेच्या इमारतीत ३० खाटांच्या क्वारंटाईन कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आयसोलेशनकरिता शहरी भागातील विविध रूग्णालयांमध्ये एकूण ५२ खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त खाटांची व्यवस्था केली गेली असल्याची माहिती मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली. मनपाच्या ३१ वार्डकरिता ३१ पथके कार्यान्वीत करण्यात आली असून त्यांच्यामार्फत घरोघरी जावून सर्वेक्षण केले जात आहे.
दरम्यान, जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल असलेल्या पाच संशयितांच्या घशांचे स्त्राव घेऊन ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. तसेच जुन्या तीन रूग्णांचे नमुने सोमवारी रात्रीपर्यंत प्राप्त झालेले नव्हते. रविवारी रात्री निगेटीव्ह अहवाल प्राप्त झालेल्या तीन रूग्णांना कोरोना विलगीकरण कक्षामधून ‘डिस्चार्ज’ देण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकिय रूग्णालयाच्या सुत्रांनी दिली. सोमवारी दाखल झालेल्या नव्या रूग्णांमध्ये दुबईवारी करून आलेल्या एका महिलेसह मुलीचा समावेश असल्याचे समजते.

Web Title: Two new suspected patients in the 'Corona' isolation room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.