राहुरीत दोन रुग्ण; परिसर कन्टेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:20 PM2020-06-05T23:20:18+5:302020-06-06T00:00:31+5:30

नाशिक तालुक्यातील भगूरजवळील राहुरी गावात एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आढळून आले असून. त्यांच्या संपर्कातील नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाने शुक्र वारी (दि.५) रोजी राहुरी येथे भेट देऊन ५०० मीटरचा परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर केला. रुग्णांना देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Two patients in Rahuri; Campus Containment Zone | राहुरीत दोन रुग्ण; परिसर कन्टेन्मेंट झोन

राहुरीत दोन रुग्ण; परिसर कन्टेन्मेंट झोन

Next

भगूर : नाशिक तालुक्यातील भगूरजवळील राहुरी गावात एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आढळून आले असून. त्यांच्या संपर्कातील नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाने शुक्र वारी (दि.५) रोजी राहुरी येथे भेट देऊन ५०० मीटरचा परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर केला. रुग्णांना देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नानेगाव, लाखलगाव विल्होळी, माडसंगवी या देवळाली मतदारसंघातील गावातील संशयित रु ग्ण दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांच्या तपासणीचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना सोडून देण्यात आले, गुरु वारी दिनांक ४ जून रोजी रात्री राहुरी येथील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना कॅन्टोन्मेंट रु ग्णालयात तर याच परिवारातील एका व्यक्तीला नाशिकच्या खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील नऊ जणांची तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी तहसीलदार अनिल दौंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भोये, बीडीओ डॉक्टर सरिता बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, डॉ. एस. एच. भामरे, डॉ.कापसे, सरपंच संगीता घुगे, पोलीसपाटील स्वाती पानसरे, ग्रामविकास अधिकारी विक्र म गवळी भाऊसाहेब आव्हाड आदींनी राहुरी येथे भेट दिली. यावेळी पाचशे मीटरचा परिसर कॅन्टेन्मेंट झोन जाहीर करत परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे.




जिल्हा परिषदेचे डॉक्टर व आशा वर्कर यांच्या माध्यमातून १४ दिवस संपूर्ण परिसराची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Two patients in Rahuri; Campus Containment Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.