पाण्याच्या शोधात दोन मोरांचा विहीरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:57 PM2019-05-04T22:57:32+5:302019-05-04T22:58:57+5:30
देवळा : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असुन नागरीकांसह पशुधन व पशु पक्ष्यांना पाणी, व चाराटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्याच्या पुर्व भागातील दिहवड परीसरात अन्न पाण्याच्या शोधात फिरणारे चार मोर तीव्र उष्णतेने भोवळ आल्यामुळे विहीरीत पडले. त्यात दोन मोर मृत्यूमुखी पडले.

तालुक्याच्या पूर्व भागातील दहीवड मेशी, उमराणा या परिसराला अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून शेती शिवारासह डोंगर परीसरात कुठेही पाणी दिसत नसल्याने पाण्याच्या शोधात पशू पक्षी नागरी वसाहतीकडे फिरु लागले आहेत. गुरूवार दि. 2 रोजी दिहवड येथील शेतकरी किसन अिहरराव यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत अन्न पाण्याच्या शोधार्थ फिरणारे चार मोर पडल्याचे शेत मालकासह स्थानिक नागरीकांच्या लक्षात आले. मदतकार्य सुरू करेपर्यंत दोन मोरांचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाला तर दोन मोरांना वाचिवण्यात स्थानिक ग्रामस्थ संजय दिहवडकर, साहेबराव वाघ, अरु ण देवरे, रविंद्र अिहरराव, बबलू सोनवणे आदिंना यश आले. याबाबत वनविभागाला खबर देण्यात आली व वनक्षेत्रपाल एफ.एम.सोनवणे यांच्या ताब्यात सदर मोर दिले. मृत मोरांचा पंचनामा करण्यात आला. शवविछ्येदनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहीती वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी ए. एन. शेख यांनी दिली. जखमी मोरांवर प्राथमिक उपचार करु न त्यांना उमराणे येथे एका शेतकर्याच्या चाळीत नैसिर्गक वातावरणात ठेवण्यात आले आहे. यावेळी वन विभागाचे वनपाल ए. ई. सोनवणे, राजेश गायकवाङ, योगेश परदेशी, वनमजूर साळुंखे आदी उपस्थित होते.