लक्झरी बसच्या धडकेत दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:03 AM2017-09-01T00:03:43+5:302017-09-01T00:03:43+5:30
भरधाव वेगाने जाणाºया लक्झरी बसने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने शहरातील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी इंदरचंद चोपडा (५३) व त्यांचा सोबत असलेला संजय भास्कर ठुबे (४५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मनमाड : भरधाव वेगाने जाणाºया लक्झरी बसने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने शहरातील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी इंदरचंद चोपडा (५३) व त्यांचा सोबत असलेला संजय भास्कर ठुबे (४५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
रात्री उशिरा चोपडा आणि ठुबे हे दोघे स्कूटीने (एमएच ४१ एएल २०६४) घरी जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाºया इंदूर - पुणे लक्झरी बसने (एमएच ४१ पी ३६६६) जोरदार धडक दिली असता या अपघातात चोपडा आणि ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला. इंदर चोपडा हे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कांदा व्यापारी होते. त्यांच्या निधनामुळे बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले. शेतकºयाची काळजी घेणारा व्यापारी अशी त्यांची प्रतिमा होती. संजय ठुबे त्यांच्याकडे कामाला होते. चोपडा व त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्यावर गाढा विश्वास होता. चोपडा कुटुंबीयात हा तिसरा अपघात असून, या अगोदर इंदर चोपडा यांच्या मुलीचा व भावाचादेखील अपघतात मृत्यू झाला आहे.
चोपडा यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी तर ठुबे याच्यामागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.