वाळूचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने महालपाटणेत दोन ठार तर दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 07:45 PM2019-01-27T19:45:46+5:302019-01-27T19:46:28+5:30
महालपाटणे : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चोरट्या मार्गाने जलद गतीने नेण्याच्या प्रयत्नात निंबोळा शिवरस्त्याला गिरणा उजव्या कालव्याच्या चारी क्र मांक आठ जवळ पलटी झाल्याने दोन युवक ठार तर दोन जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
महालपाटणे : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चोरट्या मार्गाने जलद गतीने नेण्याच्या प्रयत्नात निंबोळा शिवरस्त्याला गिरणा उजव्या कालव्याच्या चारी क्र मांक आठ जवळ पलटी झाल्याने दोन युवक ठार तर दोन जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की काल(दि.२६) दुपारी चारच्या सुमारास गिरणा उजव्या कालव्याच्या रस्त्याने बिगर नंबरचा पॉवरट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर वाळू भरून डोंगरगावकडे वेगाने जात होता.अरु ंद व उंच सखल रस्ता आण िट्रॅक्टरचा जलद गतीचा वेग यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आण िट्रॅक्टर रस्त्याच्या खाली पंधरा ते वीस फूट खोल चारीत पलटी झाल्याने ट्रॉलीमध्ये वाळूवर झोपलेले विशाल नवरे,सचिन नवरे, सुनील सोनवणे, आण िअनिल नवरे सर्व राहणार ब्राह्मणगाव(कसाडपाडे) हे कामगार ट्रॉलीखाली दाबले गेले तर ट्रॅक्टर चालक तेथून फरार झाला.आजूबाजूच्या शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेत वाळूखाली दबलेल्या तरु णांना ट्रॉलीचे फाळके तोडून कसेबसे बाहेर काढले.त्यात सुनिल पवन सोनवणे (२२)हा युवक जागीच ठार झाला तर अनिल भिका नवरे(२१) या युवकाचे मालेगाव येथे खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.विशाल बापू नवरे आण िसचिन किसन नवरे यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली.तदनंतर ट्रॅक्टर मालक योगेश उत्तम भाटेवाल (महालपाटणे)यांचेवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.राठोड,शेलार, पो.कॉ.निलेश सावकार आदी करत आहेत.
सदर प्रकरणामुळे देवळा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वर्षभरात ट्रॅक्टर मालकावर अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून चार वेळा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.चार दिवसापूर्वीच सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टर महसूल विभागाने दंड आकारून सोडला होता.