विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:11 AM2018-05-08T01:11:34+5:302018-05-08T01:11:34+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएससी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ आदेश गजेंद्र चोपडे (२१, रा़ खुटवडनगर) व चिन्मय दीपक अटराव्हलकर (२२, आयटी, वाघ महाविद्यालय) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़

 Two people who hacked the university's website by hacking the question papers | विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना अटक

विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना अटक

googlenewsNext

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएससी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ आदेश गजेंद्र चोपडे (२१, रा़ खुटवडनगर) व चिन्मय दीपक अटराव्हलकर (२२, आयटी, वाघ महाविद्यालय) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़  बीएससी द्वितीय वर्षातील लेखाकृती बीजगणित या विषयाचा पुणे, नगर व नाशिक येथे २८ एप्रिल रोजी पेपर होता़ मात्र, २७ एप्रिल रोजी रात्रीच हा पेपर सोशल मीडिया (व्हॉट्स अ‍ॅपवर) व्हायरल झाला व दुसºया दिवशीचा पेपर व व्हायरल झालेला पेपर हा तंतोतंत सारखाच होता़ विद्यपीठ अधिसभा सदस्य अमित पाटील व त्यांचे शिष्टमंडळ तसेच नाशिकमधील आमआदमी पार्टीचे जितेंद्र भावे यांनी पुणे विद्यापीठ उपकेंद्रातील कनिष्ठ सहायक योगेश सोनार यांच्याकडे पेपरफुटीबाबत निवेदन देऊन तक्रार केली़  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ नितीन करमळकर यांनी केटीएचएमचे प्राचार्य डॉ़ व्ही़ बी़ गायकवाड, हिरे महाविद्यालयाचे प्राध्यापक ए़ व्ही़ पाटील, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ़ राजेंद्र तलवारे यांची त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली होती़ या समितीने शहरातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्यानंतर आयटीचे तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थी चोपडे व अटराव्हलकर यांनी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून मिळविल्याचे समोर आले़ त्यांनी विद्यापीठाची वेबसाईट कशाप्रकारे हॅक केली व प्रश्नपत्रिका मिळविली हे लेखी स्वरूपात लिहून दिले़

Web Title:  Two people who hacked the university's website by hacking the question papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.