नाशिकरोडला तलवार घेऊन मिरविणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 01:31 AM2022-06-01T01:31:13+5:302022-06-01T01:31:33+5:30

परिसरात दहशत माजविण्यासाठी गोसावीवाडी येथे तलवारी घेऊन मिरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Two persons carrying swords on Nashik Road arrested | नाशिकरोडला तलवार घेऊन मिरविणारे दोघे ताब्यात

नाशिकरोडला तलवार घेऊन मिरविणारे दोघे ताब्यात

Next

नाशिक : परिसरात दहशत माजविण्यासाठी गोसावीवाडी येथे तलवारी घेऊन मिरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांच्या ताब्यातून धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश राजेंद्र जाधव (२२) व पवन परशराम आहिरे (२७, रा. दोघे गोसावीवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गोसावीवाडीतील पिंपळे सदन भागात दोन युवक सोमवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास नागरिकांना तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नाशिकरोड पोलिसांनी धाव घेत दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक तलवार हस्तगत करण्यात आली आहे.

Web Title: Two persons carrying swords on Nashik Road arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.