आंतरराज्यीय टोळीतील दोघा दरोडेखोरांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 01:25 AM2022-03-09T01:25:45+5:302022-03-09T01:26:16+5:30

तब्बल पाच महिन्यांपूर्वी आडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आडगाव पोलिसांनी रोखले होते. यावेळी घटनास्थळी चारचाकी सोडून पसार झालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल्या. हे सराईत गुन्हेगार अूसन त्यांच्याविषयी माहिती देत पोलिसांना मदत करणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून रोख रकमेचे बक्षीसदेखील जाहीर केले गेले होते.

Two robbers from an interstate gang were handcuffed | आंतरराज्यीय टोळीतील दोघा दरोडेखोरांना बेड्या

आंतरराज्यीय टोळीतील दोघा दरोडेखोरांना बेड्या

Next
ठळक मुद्देपाच महिन्यांपासून होते फरार : उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या

पंचवटी : तब्बल पाच महिन्यांपूर्वी आडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आडगाव पोलिसांनी रोखले होते. यावेळी घटनास्थळी चारचाकी सोडून पसार झालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल्या. हे सराईत गुन्हेगार अूसन त्यांच्याविषयी माहिती देत पोलिसांना मदत करणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून रोख रकमेचे बक्षीसदेखील जाहीर केले गेले होते.

एटीएम केंद्रावरील यंत्रे फोडून रक्कम लुटणे, बँकांमध्ये जबरी लुटीसारख्या गुन्ह्यांत त्यांचा सक्रिय सहभागी राहणारे संशयित जिशान इर्शाद खान (३२), फईम समशेर खान (४०, रा. काकराला, जि. बदायूं) असे अटक केलेल्या फरार दरोडेखोरांच्या टोळीतील दोघा संशयितांची नावे आहेत.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये (दि.२१) आडगाव पोलीस रात्र गस्तीवर असताना चार ते पाच अनोळखी व्यक्ती दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चारचाकी मोटारीतून (डीएल ०३ सीबी झेड ६३०७) संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले होते. बीटमार्शलने त्यांना हटकले असता संशयितांनी त्यांनी गाडी सोडून पळ काढला होता. त्यावेळी या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून मोटार पोलिसांनी जप्त केली होती. मोटारीतून हत्यार, स्क्रूड्रायव्हर, छन्नी एक देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांना आढळले होते. संशयित जिशान व फहीम यांना शिताफीने उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेत पोलिसांनी नाशिकला आणले. सोमवारी (दि.७) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

-इन्फो--

ककराळा गावात पोलिसांचा मुक्काम

गुन्ह्यात घटनास्थळाची माहिती घेण्यात येऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यावरून गुन्ह्यात अनोळखी इसमाचे मोबाइलद्वारे संशयित आरोपी ककराला (जि. बदायूं) उत्तर प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या आदेशान्वये गेल्या आठवड्यात सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी यांचे पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले होते.

-इन्फो--

४० सीमकार्डांचा केला वापर

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या फरार संशयितांचा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने शोध घेतला. संशयितांनी एक दोन नव्हे तर तब्बल ४० पेक्षा अधिक मोबाइल सीमकार्डांचा वापर केल्याचे आढळले. तेथे माहिती घेत दोन दिवस पाळत ठेवून ककराला भागात पथकाने मुक्काम ठोकला होता. हे दोन्ही संशयित मुख्य आरोपी फरसाद खानच्या आंतरराज्यीय टोळीतील आहेत. सराईत गुन्हेगार म्होरक्या फरसाद हा फरार असून त्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश शासनाने रोख बक्षीस घोषित आहे.

--इन्फो--

जबरी लुटीतील टोळ्यांचे वास्तव्य

उत्तर प्रदेशमधील ककराला गावात राहणारे संशयित बँक रॉबरी, एटीएम फोडणे असे गुन्हे करतात. जवळपास ५० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगार या गावात वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत टोळ्याने जाऊन जबरी लुटीचे गुन्हे करण्यात पटाईत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्रात एखादी मोटी लुटीची घटना किंवा दरोड पडल्यास पोलीस ककराला अगोदर गाठतात.

Web Title: Two robbers from an interstate gang were handcuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.