दोघा भामट्यांनी महिलेला गुंगवित अडीच तोळ्याचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 05:26 PM2019-12-07T17:26:09+5:302019-12-07T17:29:03+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील बस स्टॅन्ड समोरील फ्रुट दुकानात शनिवारी (दि.७) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दुकान चालक महिलेस फसवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.
पिंपळगाव बसवंत : येथील बस स्टॅन्ड समोरील फ्रुट दुकानात शनिवारी (दि.७) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दुकान चालक महिलेस फसवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला.
गुरूदत्त रसवंती व फ्रुट दुकानात आलेल्या दोघा भामट्यांनी केळीची खरेदी केली व दुकानातील महिला प्रमिला भाऊसाहेब संधान यांना तुमचा मुलगा देवीची खूप सेवा करतो? आम्ही पण देवीची सेवा करतो असे सांगत अकराशे रूपये काढुन त्या दोघांनी टेबलवर ठेवले व या ठिकाणी दिवा लावत पुजा केली. त्यानंतर बोलण्यात गुंग करत या पुजासाठी सोनं ठेवावे लागते असे सांगत प्रमिला संधान यांनी कानातील सोनं व हातातील अंगठी घषत ती पुजेसाठी ठेवली. पाच मिनीटात पुजा करत सदरची पुजा कपड्यात बांधून तुमच्याकडेच ठेवा असं सांगितलं व ते दोघे व्यक्ती निघून गेली.
सदर महिलाने काही क्षणातच सदरचा कपडा उघडुन बघताच त्यात काहीच नसल्याचे लक्षात आले दिड तोळा सोन्याचे दागिने लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळविले असता पोलीसांनी तात्काळ सिसिटिव्ही फुटेज बघितले असता दोघेही हेल्मेट घातलेले, पॅशन गाडीवरून शहरातून पसार झालेचे लक्षात आले.
पोलीस या बाबतीत शोध घेत असुन या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असुन असे प्रकार घडू नये यासाठी अनोळखी व्यक्ती किंवा कुठलाही भुल थापानां महिलांनी बळी पडु नये. अनोळखी लोकांबद्दल संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी केले आहे.
फोटो ०७ पिंपळगाव बसवंत)
हेच ते बस स्टॅन्ड समोर असलेले गुरूदत्त रसवंती गृह.