दोन सराईत घरफोड्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:28 AM2018-03-24T00:28:54+5:302018-03-24T00:28:54+5:30
शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
नाशिक : शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने सापळा रचून अटक केली आहे़ किरण रमेश वाघमारे (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी, नाशिक) व राजेशराम शंकर शर्मा ऊर्फ भय्या (रा. मारुती मंदिरासमोर, मदिना चौक, भद्रकाली) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांना शहरातील दोन अट्टल घरफोडे पंचवटी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीतील अमरधाम रोडवर मंगळवारी (ता.२०) सापळा लावला. या ठिकाणी संशयित वाघमारे व शर्मा येताच या दोघांनाही पथकाने ताब्यात घेतले़ या दोघां कडे चौकशी केल्यानंतर प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ यानंतर पोलीसी खाक्या दाखविताच तीन घरफोड्यांची कबुली दिली़ वाघमारे व शर्मा यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत दोन व मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका मार्गावरील ड्रीमपार्क सोसायटीत एक अशा तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे़ त्यांच्याकडून ५४ ग्रॅम वजनाचे १ लाख ५६ हजार ३६८ रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे़ सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, बाळासाहेब दोंदे, मोहन देशमुख, आसिफ तांबोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली़