विल्होळीजवळील अपघातात दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 05:13 PM2020-12-24T17:13:48+5:302020-12-24T17:14:46+5:30

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी ८.१५ च्या सुमारास घडलीअसून जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Two seriously injured in an accident near Vilholi | विल्होळीजवळील अपघातात दोन जण गंभीर जखमी

विल्होळीजवळील आठवा मैल येथील महामार्गावरील झालेल्या अपघातात मोटरसायकलची झालेली अवस्था.

Next
ठळक मुद्देजखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून नाशिककडे जात असलेल्या टँकरला मागून भरधाव असलेल्या मोटरसायकलने जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.२४) सकाळी ८.१५ च्या सुमारास घडलीअसून जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील विल्होळीजवळील आठवा मैल येथे मुंबईहून - नाशिककडे जात असतांना टँकर (एम.एच.१८, बी.जी.२८१९) ला मागून भरधाव वेगाने येत असलेल्या मोटरसायकल (एम.एच. १५, बी.पी.८१४२) ने जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात राजाराम काळु मोरे (३०, रा. दहेगाव), सुनिल पुनाजी तळपाडे (१९, रा. दहेगाव ता. जि. नाशिक) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताचा पुढील तपास नाशिक तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहे.
 

Web Title: Two seriously injured in an accident near Vilholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.