कारचे आरसे गायब करणाऱ्या दोघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:31 AM2019-11-02T01:31:09+5:302019-11-02T01:31:36+5:30
शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर नजर ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या.
नाशिक : शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर नजर ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना दोघा चोरट्यांना बेड्या ठोकण्यास यश आले. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे २७ आरसे व एक इनोव्हा कार हस्तगत करण्यात आली आहे.
शहरात महागड्या कारच्या आरशांची चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गंगापूररोडवरील रहिवासी फिर्यादी संदीप नागेश्वर भदाने (४५) यांच्या इनोव्हा क्रिस्टा कार त्यांनी एका हॉटेलसमोर उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचे दोन्ही बाजूचे एकूण पाच आरसे तोडून लंपास केले होते. या प्रकरणी त्यांनी मुंबई नाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
पोलिसांनी अशोकामार्गावरील दीप रेसिडेन्सीमध्ये राहणारा संशयित वसीम साबीर शेख (३०), पखालरोडवरील रॉयल कॉलनीमध्ये राहणारा जावेद शेख (२६, सनशाइन अपार्टमेंट) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्यांत सहभाग असल्याची कबुली दिली. कारच्या पुढील बाजूचे आरसे पॅनलसह एकूण २७ आरसे व एक इनोव्हा कार (एमएच ०४, डीएन ०२७१) जप्त केली आहे. मागील दीड महिन्यात ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे विविध भागांमधून चोरी झाले.