पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 03:42 PM2020-01-02T15:42:31+5:302020-01-02T15:55:14+5:30

रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला.

The two siblings fled the rickshaw on Peth Road | पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली

पेठरोडवर दोघा भावंडांवर कोयत्याने हल्ला करत रिक्षा पळविली

googlenewsNext
ठळक मुद्देरिक्षा, रोख रक्कम घेऊन पोबारा केलावनक्षेत्रपालाच्या कारची काच फोडलीलाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली

नाशिक : पेठरोडवरील नवनाथनगरमधील झनकर चाळीत दोघांनी कोयत्यासह धाव घेऊन दोघा भावांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. दोघा संशयितांनी फिर्यादीच्या ताब्यातील रिक्षा, रोख रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी रोहित नारायण पवार (१९, रा.नवनाथनगर) हा त्याचा भाऊ रोहित बोराडेसोबत रिक्षाने (एम.एच.१५ एफयू ३८७५) शनि मंदिरापाठीमागे गेले. तेथे दि. ३१ डिसेंबरच्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास संशयित दिगंबर वाघ, मयुर पठाडे या दोघांनी ‘तू आम्हाला सिडको येथे सोडत का नाही’ असे सांगून कुरापत काढून रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला. त्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, दोघा संशयितांनी ९०० रुपयांची रक्कम, रिक्षा बळजबरीने घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

वनक्षेत्रपालाच्या कारची काच फोडली
नाशिक : येथील प्रदीप रमेश कदम यांची (२८,रा.यशराज पार्क, कामटवाडा) ह्युंदायी कारची (एम.एच१२ आरवाय ४१४२) चालकबाजूची काच फोडून कारमधील सोनी कंपनीचे म्युझिक सिस्टीम, एसी वेन्ट, बॅगमधील शासकिय कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी कदम यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: The two siblings fled the rickshaw on Peth Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.