चोरीच्या २३ दुचाकींसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:38 PM2019-07-05T23:38:35+5:302019-07-06T00:17:42+5:30

शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला चोरीच्या २३ दुचाकीसह दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे ग्रामीण भागातील वेगवगळ्या गावांमधून दुचाकीचोरी करत असल्याचे समोर आले असून, त्यांनी काही वाहने शहरातूनही चोरली होती.

 Two stolen two-wheelers with theft | चोरीच्या २३ दुचाकींसह दोघांना अटक

चोरीच्या २३ दुचाकींसह दोघांना अटक

Next

नाशिक : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला चोरीच्या २३ दुचाकीसह दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे ग्रामीण भागातील वेगवगळ्या गावांमधून दुचाकीचोरी करत असल्याचे समोर आले असून, त्यांनी काही वाहने शहरातूनही चोरली होती. संबंधित संशयित शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी चोरलेल्या २३ दुचारी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.५) शहर पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषदेद्वारे दिली.
नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट एक मधील पोलीस हवालदार येवाजी महाले व विजय गवांदे नाशिक व ग्रामीण हद्दीमध्ये दुचाकीचोरांचा शोध घेत असताना त्यांना मनोहर ब्राह्मणे व राहुल पवार हे नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून मोटारसायकल चोरी करून त्यांची विक्री करीत असून, दोघेतीही मंगळवारी (दि.२) गोल्फ क्लब मैदान येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार येवाजी महाले, विजय गवांदे, रवी बागुल, पोलीस नाईक तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल काठे, राहुल पालखेडे यांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोल्फ क्लबजवळ सापळा लावला असता मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही संशयित निळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले. बातमीदाराने खात्री करताच पोलीस त्यांना पकडण्यासाठी सरसावले असताना दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना कोणतीही संधी न देता जागेवरच घेराव घालून पकडले. या कारवाईत पोलिसांच्या हाती लागलेले मनोहर रघुनाथ ब्राह्मणे (२५) हा दिंडोरी तालुक्यातील गणोरवाडी येथील रहिवासी असून, राहुल संजय पवार हा निफाड तालुक्यातील शिंगवे येथील राहणार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीविषयी विचारणा केली असता त्यांनी दिंडोरीतील अवनखेड येथून ती चोरी केल्याच समोर आले. त्यानंतर त्यांचा अधिक तपास केला असता अशा प्रकारच्या २३ दुचाकी त्यांनी नाशिक शहर व ग्रामीण भागातून चोरल्याची कबुली दिली असून, या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच या चोरीत त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या साथीदाराचा पोलीस सुगावा घेत आहे.
जुन्या वाहनांचा ‘बाजार’ संशयाच्या घेºयात
नाशिक शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुन्या वाहनांचा बाजार सुरू असून यात अनेक चोरीची वाहने विनाकागदपत्रांची खरेदी-विक्री केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणात अटक केलेला एका संशयिताचा स्वत:चा वाहनबाजार असल्याचे समोर आल्याने अशाप्रकारे चोरीची वाहने जुन्या वाहनांच्या बाजारात खरेदी-विक्री होत असल्याचा शक्यता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. असे वाहन बाजार संशयाच्या घेºयात आल्याने आता पोलिसांची जुन्या वाहन बाजारांवर नजर पडली असून, चोरीच्या वाहनांच्या तपासात अशा वाहन बाजारांतील वाहनांचाही तपास करण्याचा विचार सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title:  Two stolen two-wheelers with theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.