अंगणवाडीचा दरवाजा कोसळून दोन विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:24 AM2017-08-31T01:24:52+5:302017-08-31T01:24:57+5:30

येवला तालुक्यातील देशमाने बु येथील अंगणवाडी क्र . २ चा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाले. बुधवारी (दि.३०) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अंगणवाडीचे बांधकाम करणारा ठेकेदार व अधिकाºयांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Two students injured in Anganwadi's door collapsed | अंगणवाडीचा दरवाजा कोसळून दोन विद्यार्थी जखमी

अंगणवाडीचा दरवाजा कोसळून दोन विद्यार्थी जखमी

Next

देशमाने : येवला तालुक्यातील देशमाने बु येथील अंगणवाडी क्र . २ चा दरवाजा पडून दोन विद्यार्थी जखमी झाले. बुधवारी (दि.३०) दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अंगणवाडीचे बांधकाम करणारा ठेकेदार व अधिकाºयांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बुधवारी सेविका मुलांना शिकवत असताना प्रणेती रामदास बागुल व वेदांत विनायक भालके या मुलांच्या अंगावर अचानक दरवाजा कोसळला. दोन्ही मुलांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. वेळोवेळी दरवाजा दुरु स्तीची मागणी करून देखील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अंगणवाड्यांचे प्रत्येकी सहा लाख रु पये खर्च करुन बांधकाम करण्यात आले. संरक्षक भिंत बांधण्यासाठी सेविकेने ग्रामपंचायतीकडे अर्जही केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ज्या ठेकेदाराने बांधकाम केले व ज्या अधिकाºयांनी या कामाच्या बीलास मंजुरी दिली त्यांना जबाबदार धरण्यात यावे. अशी मागणी होत आहे. व या घटनेसंदर्भात गुन्हा नोंदवावा अशी मागणी येथील संदीप दुघड, भीमराज दुघड, सुरेश दुघड, शिवा खैरनार, शरद बागुल, रामदास बागुल, बाळू देवकर आदीसह ग्रामस्थानी केली आहे.
अंगणवाडीला संरक्षक भिंत नसल्याने आणि दरवाजाही व्यवस्थित नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच इमारतीत नागाने प्रवेश केला होता. च्अंगणवाडी सेविकेने प्रसंगावधान साधत नागरिकांच्या मदतीने वेळीच नागाला बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली होती. अनिकृष्ट दर्जाच्या बांधकामा बाबतीत गटविकास अधिकाºयांकडे तक्र ारी केल्या आहेत.
वरिष्ठ प्रशासन दखल घेत नसल्याने पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचे उपसरपंच भारत बोरसे, योगेश गांगुर्डे, माजी उपसरपंच अप्पासाहेब शिंदे, बाळू पवार संदीप दुघड यांनी सांगितले.

Web Title: Two students injured in Anganwadi's door collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.