गटारीत पडून दोन विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:54 PM2017-09-21T23:54:28+5:302017-09-22T00:17:13+5:30

मालेगाव येथील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या मुख्य गटारीच्या खड्ड्यात सायकलसह दोन विद्यार्थी पडल्याने जखमी झाले असून एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वेळीच नागरिकांनी पाहिल्याने खड्ड्यातील मुलांना बाहेर काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

Two students were injured in the gutter collapse | गटारीत पडून दोन विद्यार्थी जखमी

गटारीत पडून दोन विद्यार्थी जखमी

Next

आझादनगर : मालेगाव येथील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या मुख्य गटारीच्या खड्ड्यात सायकलसह दोन विद्यार्थी पडल्याने जखमी झाले असून एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वेळीच नागरिकांनी पाहिल्याने खड्ड्यातील मुलांना बाहेर काढल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
अब्दुल्ला मुख्तार अहमद (११) व कैफ आलम इफ्तेखार अहमद (१२) हे दोघे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकाजवळील गटारीच्या खड्ड्यात पडले. घटनास्थळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत रस्तारोको करण्याचा प्रयत्न केला. मनपा प्रभाग तीनचे अधिकारी किशोर गिडगे व स्वच्छता निरीक्षक इसा बेग यांनी नागरिकांची समजूत काढल्याने वादावर पडदा पडला. यावेळी मनपाच्या गलथान कारभाराचा नमुना नागरिकांना पहायला मिळाला. अब्दुल्ला मुख्तार अहमद व कैफ आलम हे एटीटी शाळेत पाचवी व सहावीच्या वर्गात शिकत आहेत. दुपारी सायकलने शाळेत जात असताना हा प्रकार घडला. सदर ठिकाणी वर्दळीचा भाग असल्याने नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. मोमीन अहमद शकील अहमद व काही तरूणांनी खड्ड्यात उडी घेत बुडणाºया अब्दुल्लास वाचविले.
जनता दलाचे मुस्तकीम डिग्नीटी, सलीम शेख यांनी मनपा प्रभाग अधिकाºयांना पाचारण करून पंचनामा करुन घेतला. सदर गटारीचा खड्डा सात फूट खोल असून, येथेच चेंबर असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी व कचरा साचत असतो. यापूर्वी बदउन्वानी मुक्त संघटनेचे रिजवान बॅटरीवाला यांनी या खड्ड्यात उतरून आंदोलन केले होते. त्यावेळी चेंबरवर जाळी बसविण्यात आली होती; मात्र सदर जाळी नादुरुस्त झाल्याने चेंबरचा खड्डा उघडा पडला.
याबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात आली नाही. सदर घटनेस महापालिका जबाबदार असल्याने मनपाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अपघातग्रस्त मुलाचे वडील मुख्तार अहमद यांनी केली आहे.

Web Title: Two students were injured in the gutter collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.