शहरात विषारी औषध प्राशन करून दोघांची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:13 PM2019-05-06T14:13:24+5:302019-05-06T14:13:54+5:30
हनुमानवाडीत धोंगडे हे कुटुंबीयांसमवेत राहात होते. रविवारी धोंगडे यांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन केले.
नाशिक: येथील हनुमानवाडी परिसरात राहणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाने राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.५) उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्माराम नाना धोंगडे (५०) असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हनुमानवाडीत धोंगडे हे कुटुंबीयांसमवेत राहात होते. रविवारी धोंगडे यांनी राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यांना त्रास जाणवू लागल्याने नातेवाईक नवनाथ कानडे यांनी एका खासगी रु ग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता, उपचार सुरू असताना धोंगडे यांचे निधन झाले. या प्रकरणी पोलीस हवालदार डी. एम. वनवे तपास करीत आहे.
आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरात राहणा-या एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल दुर्योधन माने (२५) असे आत्महत्या करणाºया युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आडगावच्या शरयू पार्क येथे विशाल माने हा राहात होता. शनिवारी (दि.४) दुपारच्या सुमारास त्याने राहत्या घरात काहीतरी विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी परिसरातील एका खासगी रु ग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.