मोबाइल खेचणाऱ्या दोन संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:05 AM2018-03-17T01:05:33+5:302018-03-17T01:05:33+5:30
आडगाव शिवारात रस्त्याने पायी जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून दुचाकीवरून येत मोबाइल खेचणाºया सय्यद पिंप्री येथील दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़
पंचवटी : आडगाव शिवारात रस्त्याने पायी जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून दुचाकीवरून येत मोबाइल खेचणाºया सय्यद पिंप्री येथील दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ रवींद्र कृष्णा दुंदे व अभिषेक संजय मराडे अशी दुचाकीवरून मोबाइल खेचून पळणाºया दोघा संशयितांची नावे आहेत़ आडगाव परिसरात गत काही दिवसांपासून संशयित रस्त्यावर थांबून मोबाइलवर बोलत जाणाºया नागरिकांवर पाळत ठेवून महागडे मोबाइल खेचून पळून जात असत़ मोबाइल खेचण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी या परिसरात गुन्हो शोध पथकाचे कर्मचारी मोबाइल चोरणाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले होते. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आडगाव परिसरातून मोबाइल चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली़ आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक पुंडलिक भोंडवे, काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगीता जाधव, लक्ष्मण बोराडे, मुनीर काझी, दशरथ पागी, सूर्यवंशी, लखन आदींनी ही कामगिरी केली आहे.