दोघा संशयितांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:54 PM2018-10-27T23:54:12+5:302018-10-28T00:28:19+5:30

दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोख पथकाने अटक केली आहे़ राकेश गोकुळ पाटील  (२२, रा़ मुसळगाव, सिन्नर) व हेमंत राजेंद्र भदाणे (२४, रा़ सातपूर) अशी या दुचाकी चोरट्यांची नावे असून, त्यांच्याकडून एक लाख रुपयांच्या तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. 

 Two suspects seized three stolen robbery | दोघा संशयितांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त

दोघा संशयितांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त

Next

नाशिक : दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोख पथकाने अटक केली आहे़ राकेश गोकुळ पाटील 
(२२, रा़ मुसळगाव, सिन्नर) व हेमंत राजेंद्र भदाणे (२४, रा़ सातपूर) अशी या दुचाकी चोरट्यांची नावे असून, त्यांच्याकडून एक लाख रुपयांच्या तीन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.   पेठ रोडवरील तवली फाट्यावर चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची माहिती म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकास मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी या ठिकाणी सापळा लावून संशयित पाटील यास ताब्यात घेतले़ असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली़ वरिष्ठ पोलीस निरीखक एस़ रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली़
पाच संशयितांकडून एकावर शस्त्राने वार
भावास शिवीगाळ केल्याची कुरापत काढून पाच संशयितांनी एकास बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना वडाळागावातील म्हाडा कॉलनीत घडली आहे़ मोसीम ऊर्फ  चिड्या शहा (३३, रा. म्हाडा वसाहत) हे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.  गुरुवारी (दि़२५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित काल्या ऊर्फ  ग्यासउद्दिन शेख व त्याच्या चौघा साथीदारांनी मोसीम शहा यांना भावास तुझ्या नातलगांनी शिवीगाळ का केली अशी कुरापत काढली़ यानंतर चौघांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, तर संशयित बशीर ऊर्फ  शेºया याने मोसीनवर धारदार हत्याराने वार केले़ या प्रकरणी संशयित शाहरुख शेख (२२, रा. मेहबूबनगर) आणि वशील सय्यद (३१, रा. वडाळा) या दोघांना अटक केली आहे. 

Web Title:  Two suspects seized three stolen robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.