जिल्ह्यात दोन हजार ८४ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 01:53 AM2021-05-20T01:53:35+5:302021-05-20T01:53:53+5:30

काेरोनाबळींची संख्या बुधवारी  (दि. १९)  पुन्हा ४० वर गेल्याने एकूण बळींची संख्या ४,२०२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,६६१ ने वाढ झाली आहे, तर एकूण २,०८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Two thousand 84 patients overcome corona in the district | जिल्ह्यात दोन हजार ८४ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात दोन हजार ८४ रुग्णांची कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देदिवसभरात १६६१ नवे रुग्ण; ४० बळी

नाशिक : काेरोनाबळींची संख्या बुधवारी  (दि. १९)  पुन्हा ४० वर गेल्याने एकूण बळींची संख्या ४,२०२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,६६१ ने वाढ झाली आहे, तर एकूण २,०८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ६०५, तर नाशिक ग्रामीणला १,०४९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १८, ग्रामीणला २२  असा एकूण ४० जणांचा बळी गेले आहेत.
जिल्ह्यात बळींच्या संख्येमध्ये 
पुन्हा  मोठी वाढ झाल्याने 
आरोग्य यंत्रणा हतबल झाली 
आहे.  तीसवर आलेली मृतांची संख्या ४० वर गेल्याने जिल्ह्यात अजूनही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांकडूनच व्यक्त होत 
आहे. 
उपचारार्थी रुग्णांत घट
n जिल्ह्यात गत काही दिवसांपासून बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचा  आकडा अधिक असल्याने सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १८,०३० वर आली आहे. गत आठवड्यात उपचारार्थी रुग्णसंख्या ७ हजारांहून कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्तीचा दर तब्बल ९४.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Web Title: Two thousand 84 patients overcome corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.