दोन हजार दुचाकी जप्त; साडेचार हजार जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:40 PM2020-05-07T22:40:05+5:302020-05-07T23:47:22+5:30

नाशिक : संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार शहरात ४ हजार ४७५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांकडील २ हजार ११६ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

 Two thousand bikes seized; Crimes against four and a half thousand people | दोन हजार दुचाकी जप्त; साडेचार हजार जणांवर गुन्हे

दोन हजार दुचाकी जप्त; साडेचार हजार जणांवर गुन्हे

googlenewsNext

नाशिक : संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांतर्फे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार शहरात ४ हजार ४७५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांकडील २ हजार ११६ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस कारवाई करीत आहेत. पोलिसांनी १ हजार ५३९ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच विनाकारण शहरात फिरणाºया, विनापरवानगी दुकाने सुरू करणारे, परिसरात घोळक्याने बसणारे, खेळणाºयांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरून अफवा, दोन समाजात तेढ निर्माण करणाºया आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. अशा ८५३ नागरिकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच २५ मार्च ते ३ मे या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर १९ लाख ८९ हजार रुपयांचा दंड केला आहे.

Web Title:  Two thousand bikes seized; Crimes against four and a half thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक